• Privacy Policy
  • Terms and Conditions

MARATHI18.com LOGO

भारतीय शेतकरी निबंध मराठी | Farmer Essay in Marathi

Set 1: भारतीय शेतकरी निबंध मराठी – farmer essay in marathi.

Table of Contents

शेतकऱ्याला अन्नदाता असे म्हणतात. शेतकरी शेतात काम करतो. तो खेड्यात, लहान गावात राहतो. भारतात बरेच शेतकरी आहेत. शेतकरी साधा पोशाख घालतो. तो पहाटे लवकर उठतो. बैलांना चारा घालतो व शेतावर काम करतो. तो ऊन, पावसाची पर्वा करत नाही. तो सतत शेतावर राबत असतो. तो शेतात वेगवेगळी पिके पिकवितो. तसेच विविध भाज्याही पिकवतो. तो गाई, म्हशी, बैल पाळतो. त्याच्या घरातील मंडळी त्याला कामात मदत करतात.

Set 2: एक भारतीय शेतकरी निबंध मराठी – Farmer Essay in Marathi

भारत हा खेड्यांचा देश आहे. बहुतेक लोक शेतकरी आहेत. सर्व शेतकरी खूप गरीब आहेत. महादू हा एक असाच शेतकरी आहे. तो खूप गरीब आहे. तो एका दूरच्या खेड्यात राहतो.

महादूचे घर अगदी लहान व साधेसे आहे. तो व त्याची पत्नी दिवसभर कष्ट करतात. महादू सकाळी उठतो व न्याहरी करतो. मग गुरांना चरायला घेऊन जातो. त्याची पत्नी स्वयंपाक करते; घरात पाणी भरते आणि मग गोठा स्वच्छ करते. गुरे चरत असताना महादू शेतीची दुसरी कामे करतो. पावसाळ्यात त्याला दिवसभर शेतातच काम करावे लागते.

महादूला दोन मुले आहेत. ती शाळेत जातात. गावात प्रवासाची साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेकदा पायीच प्रवास करावा लागतो. गावात डॉक्टर नाही. त्यामुळे महादूला आजारपणात खूप त्रास होतो. महादू गरीब आहे त्यामुळे तो मुलांना वारंवार नवीन कपडे घेऊ शकत नाही. तरी तो व त्याचे कुटुंबीय आनंदात राहतात.

Set 3: शेतकरी निबंध मराठी – Farmer Essay in Marathi

माणूस खूप पूर्वी भटक्या स्थितीत होता. तेव्हा तो शिकार करीत असे. नंतर त्याला शेतीचा शोध लागला तेव्हा तो एका जागी स्थिर झाला आणि त्याचा भटकेपणा संपला. शेतीसाठी पाणी आवश्यक असल्याने नद्यांच्या काठी शेती सुरू झाली आणि मानवी संस्कृती बहराला आली.

भारत हा प्रामुख्याने शेतीप्रधान देश आहे. येथे मोसमी पाऊस पडतो त्यामुळे ठराविक काळातच शेती करता येते. वर्षभर शेतीला पाणीपुरवठा व्हावा म्हणून सरकारने खूप धरणे बांधलेली आहेत. त्याशिवाय पाटबंधारे बांधून आणि पाणी जिरवून बारमाही पाणी मिळावे ह्यासाठी प्रयत्न चालले आहेत.

भारतात १९७६ सालानंतर हरितक्रांती करण्यात आली. उत्तम बियाण्याचा वापर, रासायनिक खते आणि जंतुनाशके ह्यांच्यामुळे शेतीचे उत्पादन खूप वाढले. परंतु रासायनिक खतांचे आणि जंतुनाशकाचे वाईट परिणामही आता दिसू लागलेले आहेत.

विदर्भात आणि देशाच्या काही भागात शेतीतून उत्पन्न पुरेसे न मिळाल्यामुळे शेतक-यांना कर्ज घ्यावे लागते. त्या कर्जाची फेड न करता आल्यामुळे काही शेतक-यांनी आत्महत्यासुद्धा केल्या. हे योग्य नव्हे.

शेतमालाला रास्त भाव आणि घाम गाळणा-याला दाम हे झाले तरच शेतकरी सुखी होईल.

Set 4: एक भारतीय शेतकरी निबंध मराठी – Farmer Essay in Marathi

आपला भारत कृषिप्रधान देश आहे. गांधीजींनी ते ओळखले होते आणि म्हणूनच ‘खेड्यांकडे चला’ असा संदेश दिला होता.

आपल्या देशातील ७० टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या शेतीवर अवलंबून असते. हा शेतकरी आपल्यासाठी अन्नधान्य, भाजीपाला, फळफळावळ पिकवतो परंतु ह्या आपल्या अन्नदात्याची स्वतःची परिस्थिती कशी आहे? आज विदर्भातील शेतकरी आत्महत्या का करतात? शेतकरी बिचारा गरीब पण त्यांच्या कष्टाचे धान्य विकून मधले दलाल आणि अडते मालामाल का? ह्या प्रश्नांचे उत्तर कुणीच देत नाही.

आपल्या देशात १९७५ सालानंतर हरित क्रांती झाली. त्यामुळे दर एकरी पिकांचे उत्पन्न वाढले. ह्या हरित क्रांतीसाठी शास्त्रीय बीबियाणे, रासायनिक खते आणि रासयानिक जंतुनाशके वापरली गेली. परंतु त्यामुळे जमिनीचा कस कमी झाला. शिवाय ही हरित क्रांती फक्त पंजाबसारख्या क्षेत्रात आणि जिथे कायम पाण्याची सोय आहे अशा क्षेत्रातच यशस्वी झाली आहे.

सर्वसामान्यतः मौसमी पावसावरच भारतीय शेतक-यांना अवलंबून राहावे लागते. पाऊस पडला नाही तर पिके वाळून जातात. नको त्या वेळी पडला तरी पिके सडून जातात. दुष्काळ पडला की उपाशी मरण्याची वेळ येते. उत्पन्न कमी असल्यामुळे शेतकरी चांगले बियाणे, औजारे, बैल खरेदी करू शकत नाही. तो अशिक्षित किंवा अल्पशिक्षित असल्याने अंधश्रद्ध आणि चुकीच्या रूढींचे पालन करणारा आहे. गावातील शाळा दूर दूर असतात, असल्या तरी तिथे शिक्षक नसतात अशी खेड्यांतील शाळांची दुरवस्था आहे. त्यातच भर म्हणून नाईलाजाने शेतक-यांना आपल्या मुलांना गुरे चारायला आणि शेतीकामासाठी पाठवावेच लागते.

परंतु भारत सरकारने शेतक-यांच्या मदतीसाठी काही चांगल्या योजना आणलेल्या आहेत. त्याला कमी व्याज दरावर कर्ज देण्याची व्यवस्था आहे. त्यातून तो बी बियाणे आणि खते घेऊ शकतो. विहीर बांधणे, कूपनलिका खोदणे ह्यासाठी मदत करणा-या योजनाही असतात. पण काय होते की बरेचदा योजना चांगल्या असतात. परंतु त्यांची अंमलबजावणी होताना मधलेच लोक पैसे खातात आणि ख-या गरजूंपर्यत योजनेचे फायदे पोचतच नाहीत. शिवाय अशिक्षितपणामुळे शेतकरीही आपल्या हक्कांबाबत जागरूक नसतो. ह्यासाठीच हल्ली सरकारने सर्वांना सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केलेला आहे. तो नीट राबवण्यात आला पाहिजे.

तसेच शेतक-याला कोंबडी आणि अंड्यांची पैदास, अळंबीचे उत्पादन, किना-या- वरच्या शेतक-यांना कोळंबीची शेती, गाईम्हशी पालन असे जोडधंदे करण्यासही उत्तेजन द्यायला हवे आहे. शेतीव्यतिरिक्तच्या वेळात करण्याचे इतरही काही उद्योग त्याला शिकवले पाहिजेत.

जोपर्यंत आपला शेतकरी अडाणी आणि निर्धन आहे तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही ही अगदी काळ्या दगडावरची रेघ आहे.

Set 5: एक भारतीय शेतकरी निबंध मराठी – Shetkari Nibandh in Marathi – Farmer Essay in Marathi

आपला भारत कृषिप्रधान देश आहे. गांधीजींनी ते ओळखले होते आणि म्हणूनच ‘खेड्यांकडे चला’ असा संदेश दिला होता. आपल्या देशाचा आत्मा खेड्यात आहे, खेड्यातील शेतक-यात आहे. आपल्या देशातील ७० टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या शेतीवर अवलंबून असते. हा शेतकरी आपल्यासाठी अन्नधान्य, भाजीपाला, फळफळावळ पिकवतो परंतु ह्या आपल्या अन्नदात्याची स्वतःची परिस्थिती कशी आहे? आज विदर्भातील शेतकरी आत्महत्या का करतात? शेतकरी बिचारा गरीब पण त्यांच्या कष्टाचे धान्य विकून मधले दलाल आणि अडते मालामाल का? ह्या प्रश्नांचे उत्तर कुणीच देत नाही.

आपल्या देशात १९७५ सालानंतर हरित क्रांती झाली. त्यामुळे दर एकरी पिकांचे उत्पन्न वाढले. ह्या हरित क्रांतीसाठी शास्त्रीय दृष्टीने तयार केलेले बीबियाणे, रासायनिक खते आणि रासयानिक जंतुनाशके वापरली गेली. परंतु त्यामुळे जमिनीचा कस कमी झाला. शिवाय ही हरित क्रांती फक्त पंजाबसारख्या क्षेत्रात आणि जिथे कायम पाण्याची सोय आहे अशा क्षेत्रात यशस्वी झाली आहे.

सर्वसामान्यतः मौसमी पावसावरच भारतीय शेतक-यांना अवलंबून राहावे लागते. पाऊस पडला नाही तर पिके वाळून जातात. अवकाळी पडला तरी पिके सडून जातात. दुष्काळ पडला की उपाशी मरण्याची वेळ येते. इतकी मेहनत करूनही शेतकरी गरीब का? आणि शेतीचा उद्योग तोट्यात का? उत्पन्न कमी असल्यामुळे तो चांगले बियाणे, औजारे, बैल खरेदी करू शकत नाही. तो अशिक्षित किंवा अल्पशिक्षित असल्याने अंधश्रद्ध आणि चुकीच्या रूढींचे पालन करणारा आहे. गावातील शाळा दूर दूर असतात, असल्या तरी तिथे शिक्षक नसतात अशी खेड्यांतील शाळांची दुरवस्था आहे. त्यातच भर म्हणून नाईलाजाने शेतक-यांना आपल्या मुलांना गुरे चारायला आणि शेतीकामासाठी पाठवावेच लागते.

परंतु भारत सरकारने शेतक-यांच्या मदतीसाठी काही चांगल्या योजना आणलेल्या आहेत. त्याला कमी व्याज दरावर कर्ज देण्याची व्यवस्था आहे. त्यातून तो बीबियाणे आणि खते घेऊ शकतो. विहीर बांधणे, कूपनलिका खोदणे ह्यासाठी मदत करणा-या योजनाही असतात. पण काय होते की बरेचदा योजना चांगल्या असतात. परंतु त्यांची अंमलबजावणी होताना मधलेच लोक पैसे खातात आणि ख-या गरजूंपर्यत योजनेचे फायदे पोचतच नाहीत. शिवाय अशिक्षितपणामुळे शेतकरीही आपल्या हक्कांबाबत जागरूक नसतो. ह्यासाठीच हल्ली सरकारने सर्वांना सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केलेला आहे. तो नीट राबवण्यात आला पाहिजे. तसेच शेतक-याला कोंबडी आणि अंड्यांची पैदास, अळंबीचे उत्पादन, किनायावरच्या शेतक-यांना कोळंबीची शेती, गाईम्हशी पालन असे जोडधंदे करण्यासही उत्तेजन द्यायला हवे आहे. शेतीव्यतिरिक्तच्या वेळात करण्याचे इतरही काही उद्योग त्याला शिकवले पाहिजेत.

Set 6: मी एक कष्टाळू शेतकरी निबंध मराठी

मी एक छोटा शेतकरी आहे. माझ्याकडे खूप कमी शेती आहे. ही जमीन मला माझ्या वाडवडिलांकडून मिळाली आहे. माझे माझ्या जमिनीवर प्रेम आहे. मी आणि माझी बायको आमच्या जमिनीची खूप काळजी घेतो. आम्ही मशागत करतो. त्यामुळे आमची ‘काळी आई’ आम्हांला उपाशी ठेवत नाही.

मात्र कितीही कष्ट केले, तरी संकटे चुकत नाहीत. मध्ये दोन वर्षे पाऊसच पडला नाही. पीक आले नाही. तेव्हा सरकारने सुरू केलेल्या दुष्काळी कामांवर आम्ही जात होतो. एका वर्षी बी-बियाण्यांत भेसळ निघाली. लावलेले पीक आलेच नाही. कष्ट वाया गेले!

कितीही कठीण वेळ आली, तरी मी सावकाराचे कर्ज काढत नाही. मला दारूचे व्यसन नाही. मला विडी-तंबाखूचेही व्यसन नाही. मी वारेमाप खर्च करत नाही. मी शेताच्या कडेला बांबू, बोरीबाभळी लावल्या आहेत. मी शेतात चिंचेची झाडे लावली आहेत. मला चिंचेचे थोडे पैसे मिळतात. शेतातील काही भागात मी फुलशेती करतो. पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरतो. कष्टाला घाबरत नाही. त्यामुळे आमची पासमार होत नाही.

  • भारतीय लोकशाही निबंध मराठी
  • भारतीय राज्यघटना निबंध मराठी
  • भारतातील वैज्ञानिक प्रगती निबंध मराठी
  • भारतातील वनसंपदा निबंध मराठी
  • भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर निबंध मराठी
  • डॉ विक्रम साराभाई निबंध मराठी
  • भारत माझा जगी महान मराठी निबंध
  • विविधतेत एकता निबंध मराठी
  • भाज्या आणि फळांचे महत्व निबंध मराठी
  • भाऊबीज निबंध मराठी
  • भटक्या जमातीतील तरुणाची कैफियत
  • भगवान गौतम बुद्ध निबंध मराठी
  • बैल प्राणी निबंध मराठी
  • बालमजुरी निबंध मराठी
  • माझे बालपण निबंध मराठी
  • बालदिन निबंध मराठी
  • बाबा आमटे निबंध मराठी

Leave a Reply Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

शेतकरी मराठी निबंध | Farmer essay in marathi

Farmer essay in marathi: मित्रानो आपल्या देशात वेगवेगळ्या लोकांद्वारे वेगवेगळे  व्यवसाय केले जातात . 

पण आजच्या या निबंधाचा विषय आहे शेतकरी निबंध मराठी . शेतकरी हा अन्नदाता म्हणून ओळखला जातो. आज आपण याच अन्नदात्याबद्दल  Farmer essay in marathi प्राप्त करणार आहोत तर चला सुरू करुया.

शेतकरी निबंध मराठी। Shetkari Nibandh in Marathi (150 Words)

भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. भारतात जवळपास 22 प्रमुख भाषा व 720 बोल्या बोलल्या जातात. भारतात अनेक तऱ्हेचे व्यवसाय केले जातात. पण शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे. म्हणूनच भारताला 'कृषी प्रधान देश' म्हणून सुद्धा ओळखले जाते. शेतकरी भारताचा कणा आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेत त्याचे 17% योगदान आहे.  शेतकऱ्यांमुळेच भारत आज अन्नाच्या बाबतीत आत्मनिर्भर आहे. या शिवाय दर वर्षी खूप सारे खाद्यान्न भारतातून इतर देशांना निर्यात केले जाते.

भारतीय शेतकऱ्याचे अर्थव्यवस्थेत येवढे मोठे योगदान असताना देखील त्याची अवस्था आज दयनीय आहे. शेतकरी आज आत्महत्या करीत आहेत. काही शेतकरी शेती सोडून इतर व्यवसाय पाहत आहेत. खेड्यातून रोजगाराच्या शोधात शहरी भागात येत आहेत. शेतकरी व त्यांच्या कुटुंबाला दोन वेळेचे जेवण मिळणे सुद्धा कठीण झाले आहे. 

शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांकडे सरकारने लवकरात लवकर लक्ष द्यायला हवे. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण द्यायला हवे. शासनाने त्यांच्या धान्याला योग्य भाव मिळवून द्यायला हवा. नाहीतर तो दिवस दूर नाही जेव्हा आपण खाद्य निर्यात देशापासून एक खाद्य आयातक देश बनून जाऊ. 

शेतकऱ्याची आत्मकथा वाचा येथे

शेतकरी निबंध मराठी। Shetkari Essay in Marathi   (150 Words)

भारत हा एक कृषी प्रधान देश आहे. भारताच्या या खाद्य संपन्नते मागे शेतकऱ्याचे योगदान मोलाचे आहे. भारत ही शेतकऱ्याची भूमी आहे. आपल्या देशाची 72% लोकसंख्या गावामध्ये राहते व शेती करते. भारतीय शेतकऱ्याचा सर्वकडे सन्मान होतो. कारण शेतकरीच संपूर्ण देशासाठी खाद्य उगवतो. शेतकऱ्याचे जीवन अतिशय व्यस्त असते. शेत नांगरणे, बी लावणे, रात्रंदिवस शेताची राखण करणे इत्यादी कार्यामध्ये शेतकरी कायम गुंतलेला असतो.

शेतकरी सकाळी लवकर उठतो आपले बैल आणि इतर सर्व सामान घेऊन शेताकडे निघतो. तासनतास तो शेतात काम करतो. शेतकऱ्यांच्या घराचे इतर लोक सुद्धा शेतात त्याची मदत करतात. शेतकऱ्याचे जेवण अतिशय साधे असते. बरेच शेतकरी चटणी भाकर खाऊन दिवस काढत असतात. दुपारी शेतकऱ्यांच्या घरून त्याची पत्नी किंवा दुसरे कोणीतरी जेवण घेऊन येते. शेतकरी जेवण करून काही मिनिटांच्या विश्रांती नंतर पुन्हा आपल्या कामाला लागतो. तो कठीण परिश्रम करतो. पण एवढ्या परिश्रमानंतर देखील त्याला जास्त लाभ होत नाही. 

शेतकऱ्याचे जीवन खूपच साधे असते. त्याचा पेहराव ग्रामीण असतो. बरेच शेतकरी कच्या घरात राहतात. शेतकऱ्याची संपत्ती बैल आणि काही एकर जमीन असते. शेतकरी हा देशाची आत्मा असतो. लाल बहादूर शास्त्री यांनी 'जय जवान जय किसान' चा नारा दिला होता. त्यांनी म्हटले होते की शेतकरी हा भारताचा आत्मा आहे. म्हणून आज शेतकऱ्याला सरकार द्वारे अधिकाधिक मदत मिळायला हवी. त्यांना शेताचे सर्व आधुनिक यंत्र व कीटनाशके उपलब्ध करून द्यायला हवेत.

स्वातंत्र्यप्राप्तीच्या अनेक वर्षांनंतर ही शेतकऱ्यांची स्थिती जशीच्या तशी आहे. बऱ्याच शेतकरी कुटुंबांना दोन वेळचे जेवण मिळणे देखील कठीण आहे. ज्यामुळे दरवर्षी अनेक शेतकरी आत्महत्या करतात. पण 2015 च्या एका रिपोर्टनुसार आता देशातील शेतकरी आत्महत्या दरात घट झाली आहे. शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नष्ट झालेल्या पिकाबद्दल योग्य भरपाई देण्यासाठी कायदे बनवले आहेत. दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ठराविक रक्कम जमा केली जाते. ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीला थोडी फार का होईना पण मदत होते. 

शेतकरी संपावर गेला तर निबंध वाचा येथे

शेतकरी मराठी निबंध | Farmer Essay in  Marathi  (300 Words)

भारताला कृषी प्रधान देश म्हटले जाते. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा शेती हाच आहे. शेतात काम करणाऱ्या व्यक्तीला शेतकरी म्हटले जाते. शेतकरी हा संपूर्ण दिवस शेतात काम करतो. ऊन, वारा, पाऊस इत्यादींची पर्वा न करता आपले कार्य करीत असतो. शेतकरी कठीण परिश्रमाचे प्रतीक आहे. त्याच्यात फार संयम असतो. वर्षभर शेतात काम करून तो आपल्या कष्टाच्या फळाची वाट पाहत बसतो. 

शेतकरी आपले जीवन सन्मानाने जगतो. आपले संपूर्ण आयुष्य निसर्गाच्या सानिध्यात घालवतो. शेतकऱ्याचे जीवन संतुलित असते. तो दररोज सकाळी लवकर उठतो. दिवसभरात त्याला अनेक कामे करायची असतात. सकाळी लवकर उठून तयारी वैगरे करून तो शेताकडे निघतो. तो आपला संपूर्ण दिवस शेतातील पिकांची काळजी मध्ये घालवतो. शेत नांगरणे, पीक पेरणे, पिकाला पाणी देणे, ऊन वाऱ्यापासून आपल्या पिकाचे रक्षण करणे इत्यादी अनेक कामे शेतकऱ्याला करावी लागतात. 

शेतकरी त्याचे पीक अनेक नैसर्गिक आपत्या पासून संरक्षित करतो. पशु, पक्षी, किडे, मुंग्या इत्यादींपासून तो आपल्या पिकाचे रक्षण करतो. शेतात सुंदर बहरलेल्या पिकामागे शेतकऱ्याची शेताविषयीची भक्ती, प्रेम आणि कठीण परिश्रम असते. एक शेतकरी संपूर्ण जगातील मानवाला अन्न पुरविण्यासाठी आपल्या जीवन व्यतीत करतो. दिवसभर शेतात काम केल्यावर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर शेतकरी आपल्या घरी पोहोचतो. ज्यावेळी तो घरी पोचतो तेव्हा तो अत्यंत थकलेला असतो पण तरीही त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असतो. हा आनंदच त्याच्या कष्टाचे फळ असते. 

कोणत्याही देशाच्या यशासाठी शेतकऱ्यांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. शेतकरी आपल्या प्रयत्नांनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत करू शकतो. आणि म्हणूनच शेती व शेतकऱ्याला अर्थव्यवस्थेचा कणा म्हटले जाते. देशातील शासनाची ही जबाबदारी आहे की त्यांनी शेतकऱ्याची योग्य सोय करायला हवी, जेणेकरून ते कोणत्याही अडथळ्याशिवाय आपले कार्य करू शकतील. 

शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपयोगात आणण्यासाठी शासनाने प्रोत्साहित करायला हवे. आधुनिक पद्धतीने केलेली शेती त्यांना कमी कष्टात जास्तीचे उत्पन्न मिळवून देऊ शकते. शेतकऱ्याचे जीवन आपल्याला अनेक शिकवण देऊन जाते. त्यांचे कठीण परिश्रम आणि संयम आपण सर्वांसाठी एक एक उदाहरण आहे. आणि म्हणूनच आपण सर्वांची जबाबदारी आहे की आपण शेतकऱ्यांना शक्य होईल तशी मदत करायला हवी. जर काही कारणास्तव शेतकऱ्याचे पीक नष्ट झाले असेल तर त्याला आर्थिक सहाह्य करायला हवे.

तर मित्रांनो हे होते  shetkari marathi nibandh . आपल्या देशात shetkari jagacha poshinda  म्हणून ओळखला जातो. आशा करतो की हा Farmer essay in marathi तुम्हाला नक्कीच आवडला असेल. ह्या निबंधाला इतरांसोबतही शेअर करा. धन्यवाद..  

2 टिप्पण्या

Hi Mohit, it's a very good initiative. Keep up the good work, God Bless you

Shetkaryache mahatva & sainikache mahatva ya vishayanvar 5 te 6 wakyancha lahaan mulansathi nibandh pathval ka?

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

भारतीय शेतकरी मराठी निबंध Indian Farmer Essay in Marathi

Indian Farmer Essay in Marathi: शेतकरी श्रम, सेवा आणि त्यागाची साक्षात मूर्ती आहे. फाटलेले कपडे,  बारीक शरीर आणि उघडे पाय त्याच्या खराब आयुष्याची कहाणी सांगतात. त्याला जगत्पिता म्हणतात, तरीही त्याच्या झोपडीत अजूनही भूक आणि दारिद्र्याचे साम्राज्य आहे.

शेतकरी पहाटेच आपल्या शेतात जातो आणि आपल्या कामाला सुरुवात करतो. तो दुपारपर्यंत सतत परिश्रम करतो. तो अन्न आणि थोडी विश्रांती घेतो आणि नंतर संध्याकाळपर्यंत कठोर परिश्रम करतो. तो कडक उन्हातही आपल्या लाडक्या शेतात आपला घाम गाळतो. अगदी कडाक्याच्या पावसातही तो आपले काम चालूच ठेवतो. या कठोर परिश्रमानंतरही, जेव्हा भाग्यदेवता त्यांच्यावर प्रसन्न नसते, तेव्हा त्याला मन मारून राहावे लागते.

जीवनाचा झरा

भारतीय शेतकऱ्याची जीवनशैली अतिशय सोपी व सरळ आहे. तो आपल्या कुटूंबासह लहान झोपडी किंवा मातीच्या घरात राहतो. त्याला जीवनावश्यक वस्तू देखील मिळत नाहीत, तरीही तो आपले आयुष्य समाधानाने घालवितो. तो केवळ निसर्गाशी जुळलेला असतो. धैर्य आणि स्वाभिमानाने भरलेला असतो. तो कठोर परिश्रम आणि सेवेचा एक अवतार आहे. दान-देणगी देण्यात तो कसलाही विचार करत नाही.

आपले बहुतेक शेतकरी अशिक्षित आणि अंधश्रद्धाळू आहेत. भूत आणि जादूटोण्यावर त्याचा अटल विश्वास आहे. तो मृत्यु भोज, लग्न इत्यादींमध्ये आपली कष्टाची कमाई घालवून टाकतो. अशा बऱ्याच खर्चामुळे तो बर्‍याचदा सावकार आणि जमीनदारांच्या तावडीत सापडतो. ललित कला आणि उद्योगांमध्ये रस नसल्यामुळे तो वर्षामध्ये चार महिने हातावर हात ठेऊन बसलेला असतो. कधीकधी भांग, तंबाखू आणि मद्य यासारख्या मादक पदार्थांचे सेवन करून तो त्याच्या सोन्यासारखा जगाला आग लावतो.

स्वातंत्र्य आणि शेतकरी

स्वातंत्र्यानंतर भारतीय शेतकर्‍याचे आयुष्य काही प्रमाणात सुधारत आहे. आता त्याला शेतीच्या नवीन पद्धती शिकवल्या जात आहेत. सरकार त्याला चांगले बियाणे, रासायनिक खते आणि मशीन्स खरेदी करण्यासाठी भरपूर पाठिंबा देत आहे. त्याला सावकार आणि जमीनदारांच्या पंज्यातून मुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. ग्रामपंचायतींच्या स्थापनेमुळे त्याचे आयुष्य खूप गतीने बदलत आहे.

खरोखर शेतीप्रधान भारतात शेतकर्‍याचे खूप मोठे स्थान आहे. ज्या दिवशी शेतकरी आनंदाची भरारी घेईल त्या दिवशी भारताचे भाग्य चमकेल.

हे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-

  • My Favorite Fruit Essay Mango: The King of Fruits | माझे आवडते फळ आंबा मराठी निबंध
  • Saksharta che mahatva Essay | Saksharta che mahatva Nibandh | साक्षरतेचे महत्व निबंध मराठी.
  • Maze avadte thikan Essay In Marathi | My favorite tourist spot | माझे आवडते पर्यटन स्थळ निबंध मराठी
  • माझे आवडते फूल गुलाब मराठी निबंध | Maze Avadte Ful Gulab Marathi Nibandh | My Favorite…

Marathi Essay

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

Shetkari Nibandh in Marathi | Essay on Farmer in Marathi | शेतकरी निबंध

शेतकरी निबंध Shetkari Nibandh in Marathi Essay on Farmer in Marathi -शेतकरी हा भारतामधील सर्वात अभागी जीव आहे. शेतकरी भारतातील सर्वांना अन्न पुरवठा करतो मात्र तो स्वतः कुपोषित आहे.  ऊन, वारा, पाऊस, थंडी या कशाचीही पर्वा न करता काबाडकष्ट करून, मेहनत करून तो आपल्या पोटासाठी पैसा मिळवतो. परंतु आजपर्यत तो पैसा त्यास श्रीमंत करून शकला नाही किंवा शेतकऱ्यांची चिंता मिटवू शकला नाही. चला तर मग आज आपण शेतकरी निबंध पाहू या.

Contents hide 1 Shetkari Nibandh in Marathi 2 Essay on Farmer in Marathi 3 शेतकरी निबंध Shetkari Nibandh in Marathi

शेतकरी स्वतः कापूस पिकवतो, मात्र त्याच्या अंगावर कपडे नसतात. लाखो रुपयांच्या शेतीचा तो मालक असतो. परंतु खिशात त्याच्या दमडीही नसते.  लाखो रुपयांची स्थावर मालमत्ता असलेल्या शेतकऱ्याकडे कर्ज घेण्यावाचून पर्याय नसतो. जमीन विकला जात नाही कारण ती मुलांसाठी लागते. कसेही उसने पासने करून तो त्याचा उदरनिर्वाह करतो.

कारण दरवर्षी पीक चांगले येईलच असे नाही .उत्पादन होईलच असे नाही, आणि शेती मालास भाव मिळेल असेही नाही,   त्यामुळे भाव ठरवण्याचा अधिकार जर शेतकऱ्याला मिळाला तर शेतकऱ्यांची परिस्थिती ही वाईटाकडून चांगली होईल.

आमच्या अद्भुत माराठी ब्लॉगला पण भेट द्या

भारतातील शेतकरी फक्त शेती पिढ्यानपिढ्या पिकवत आहे त्या पिकवण्याचा मोबदला शेतकऱ्यास अजून पर्यंत मिळालेला नाही कारण शेतमालाचे भाव शेतकऱ्यांच्या मनासारखे कधीच नसतात.

सर्व वस्तूंचे भाव वाढतील परंतु शेतकऱ्याच्या मालाचे भाव कधीच वाढत नाही आणि त्यामुळे पिढ्यानपिढ्या शेतकरी हा दरिद्री राहतो ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर व्यापारी मात्र श्रीमंत होत असतो कोणताही घाम न गाळता व्यापारी कापड कष्ट न करता शेतकऱ्यांच्या जीवावर भरमसाठ पैसे कमावतात शेतकऱ्यांचा छळ करतात बियाणे कंपन्या कीटकनाशके किंवा खाते हे बोगस देतात आणि त्यामुळे उत्पादन हे कमी होते भावात असलेली चढ-उतार शेतकऱ्यांचा जीव खालीवर करते

शेतकऱ्यांकडून मातीमोल किमतीने धान्य कापूस सोयाबीन ऊस केली घेतल्या जाते. त्यातच आता वनसंरक्षण कायदा हा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे कारण निघायचे कळप डुकरांचे कळप हरिणांच्या कळपावर शेतामध्ये घेऊन हजारो हेक्टर पीक फस्त करत असतात परंतु कोणीही त्याची तक्रार न करता निमुटपणे ते सहन करत राहतो.

त्यात अनियमितपणे बरसणारा पाऊस शेतकऱ्यांच्या पिकाचे फार मोठे नुकसान करतो अतिवृष्टी आहे अवकाळी पाऊस आहे वादळ वाऱ्यासह गारपीट आहे पूर आहे पिकांवर येणारी कीड आहे विविध रोग आहेत इत्यादी कारणांमुळे पिकांचे फार मोठे उत्पन्न घटते आणि एक प्रकारे निसर्ग हा शेतकऱ्यांची परीक्षा पाहतो.

Essay on Farmer in Marathi

शेतकरी या सर्व अडचणींवर मात करून आपला आयुष्य जगत असतो अन्नाची गरज भागवत असतो आणि कष्टाने आपलं जीवन फुलवत असतो.

भारत हा खेड्यात आहे असे म्हटले जाते कारण ग्रामीण जीवन हे शेतकऱ्यांविना अपुरे आहे. त्यांच्या शिवाय ग्रामीण जीवन असू शकत नाही कारण या ग्रामीण भागातूनच मोठे कलेक्टर डॉक्टर वकील इंजिनिअर चांगले राजकारणी निर्माण झालेले आहेत यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी वर्गांचे मुल आहेत.

परंतु आपल्या भारतामध्ये सावकार वकील असतील कारकून असतील असे सर्वांकडून शेतकऱ्याच्या अज्ञानाचा फायदा घेतला जातो म्हणूनच आज शेतकरीवर्गाला शिक्षणाची गरज आहे या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी त्यांना शिक्षण मिळाले पाहिजे हाच त्यांच्यासाठी सर्वात मोठा उपाय आहे अशाप्रकारे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुचवला आहे.

लालबहादुर शास्त्री यांनी जय जवान जय किसान असा नारा दिला आणि शेतकऱ्यांचा एक प्रकारे गौरवच केला महात्मा गांधीजींनी ही स्वातंत्र्यापूर्वीच समर्थ होतील ‘खेड्याकडे चला’ कारण खरा भारत हा खेड्यातच आहे. शेतकरी हा आता पूर्वीसारखा आला आला नाही चांगली बी-बियाणे खते वापरून बऱ्यापैकी उत्पन्न काढू शकला आहे.

शेतकरी निबंध

अशा शेतकऱ्यांच्या घरात आणि शेतीमध्ये विजा हे सौर पंपा आहेत त्यामुळे शेतकऱ्याला पाहिजे तसे उत्पन्न काढता येऊ शकते परंतु शेतकरी मित्रांनी सुद्धा नवीन आधुनिक साधनांचा वापर करून आपल्या शेतातील उत्पन्न वाढवले पाहिजे तरच ची शेतकऱ्यांकडे बघण्याची नजर आहे ती बदलेल शेतकर्‍यांकडे हि पैसे असतील त्यामुळे त्यांना सुद्धा मानपान मिळेल

शेतकरी आज जगाचा पोशिंदा म्हटल्या जाते शेतकऱ्यांमध्ये साक्षरता ही 25 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे उलेले 75 टक्के शेतकरी अजूनही अशिक्षित आहेत अंधश्रद्धाळू आहेत त्यामुळे यावर मात करणे शेतकऱ्यांना खूप आवश्यक आहे

जास्त शेती असणारे शेतकरी श्रीमंत आहेत परंतु कमी शेती असणारे शेतकरी अजूनही गरीबच आहेत. त्यांच्याकडून कवडीमोलाने माळ घेतला जातो, आणि शहरांमध्ये सोन्याच्या भावाने हे व्यापारी शेतकऱ्यांचा माल विकतात आणि त्या मालावरच ते स्वतः गर्भश्रीमंत होतात आणि त्यामुळेच शेतकरी शहराकडे वळतो आहे.

काबाड कष्ट करून, मेहनत करून आपल्या सर्वांचे पोट भरणाऱ्या शेतकर्‍यास माझा मानाचा मुजरा! तुम्हाला विविध योजनांबद्दल माहिती हवी असेल तर आमच्या शेतकरी या ब्लोग ला नक्की भेट द्या

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Marathi Delight

शेतकरी वर निबंध | Farmer essay in Marathi

Farmer essay in Marathi

नमस्कार मंडळी,

आजच्या या लेखामध्ये आपण शेतकरी राजावर निबंध लिहिणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो या निबंधमार्फत आपण शेतकरी राजाचा जीवन सुद्धा जाणून घेणार आहोत. शेतकरी राजा विषयी अधिक माहिती व Farmer essay in Marathi साठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

शेतकरी वर निबंध | Farmer essay in Marathi (300 words)

समाजात व संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी अतिशय महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावतात. शेतकरी हा प्रत्येक मानवी जीवनातील एक महत्त्वपूर्ण घटक बनला आहे. मित्रांनो आज मी या निबंध लेखनामार्फत शेतकरी  राजाचे महत्त्वपूर्ण विविध प्रकारचे पैलू व शेतकरी राजाला आपण विविध प्रकारच्या दृष्टिकोनातून कसे समजू शकतो हे सांगणार आहे.

Farmer essay in Marathi-मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की शेतकरी आपल्या दैनंदिन जीवनात किती महत्त्वाची भूमिका बजावतात? शेतकरी हा जगातील अन्नपुरवठ्याचा प्राथमिक उत्पादक असून मानवी जीवनासाठी आवश्यक असलेले सर्व प्रकारची पोषक तत्वे पोहोचविण्याचे काम शेतकरी करतात. शेतकरी राजाने आपल्या शेतीमध्ये पशुधन वाढवतात त्याच बरोबर विविध प्रकारच्या पिकांची लागवड शेतामध्ये करून चांगल्या प्रकारची उत्पादने घेऊन  मानवी जीवनाला सहाय्यक करतात.

तुम्ही कधी विचार केला आहे का की  जर आपल्याला जेवायलाच मिळाले नाही तर आपण कसे होऊ? सर्व जगात अन्नाची तीव्र टंचाई निर्माण होऊन सर्व बालके व मानवी जीवन अस्ताव्यवस्था होऊन शाकाहारी प्राणी त्याचबरोबर पृथ्वीतलावरील प्रत्येक जीव हा कुपोषित होऊन अन्नाची तीव्र  टंचाई निर्माण होईल.अर्थातच शेतकरी राजा शिवाय पृथ्वीतलावर अन्नाची तीव्र टंचाई निर्माण होईल.

या व्यतिरिक्त तुम्हाला तर माहितीच असेल की अनेक देशांची अर्थव्यवस्था ही उत्पादनावर  सुद्धा चालते. बहुतेक देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचे महत्वपूर्ण योगदान आहे.आपल्याला नेहमीच असं वाटत होतं की शेतामध्ये जेव्हा उत्पन्न निघताय आणि त्याची व्यापाराकडे जाऊन जेवढी विक्री होत आहे फक्त आपल्याला तेवढाच फायदा होत असतो परंतु या व्यतिरिक्त सुद्धा शेतीचे विविध प्रकारचे फायदे आहेत.

कधीही डोळ्यांना दिसणारा शेतीचा हा उद्योग अन्नप्रक्रिया, वाहतूक अशा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या सर्वत्र संधी उपलब्ध करून देत आहेत. जर आपण शेतकऱ्यांची मदत करून त्यांना कृषी क्षेत्रामध्ये असलेल्या वाढत्या ज्ञानाची माहिती देऊन शेतीमध्ये जास्तीत जास्त मेहनत न घेता उत्पादन कसे काढायचे यासाठी जर आपण त्यांना मदत केली तर ग्रामीण भागातील शेतकरी सुद्धा  गरीबीतून बाहेर निघतील असे मला वाटते.छोट्या छोट्या गावांमध्ये अर्थातच संपूर्ण देशात ग्रामीण भागामध्ये शेती हा प्रत्येक घरोघरी चालणारा व्यवसाय असतो. म्हणजेच ग्रामीण भागांना शेतकरी हा कणा असतो.

शेतकरी वर निबंध | Farmer essay in Marathi (400 words)

Farmer essay in Marathi-भारत कृषी प्रधान देश आहे. भारतामध्ये ग्रामीण भागात शेती हा व्यवसाय बहुतेक प्रमाणात चालतो. ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी कमी असून शेती हा रोजच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक बनलेला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी शेती ही एक जगायचं साधन बनलेला आहे. ग्रामीण भागातील शेती करण्यामुळे शेतकरी स्थानिक अर्थव्यवस्था, शाळा व विविध प्रकारच्या सुविधा पायाभूत टिकविण्याचा प्रयत्न करणे.शेतकरी राजाच समाजामध्ये खूप मोठे योगदान आहे.

जागतिक स्तरावर अन्न संकट टाळण्यासाठी शेतकरी राजा हा नेहमी रात्रंदिवस कष्ट करत असतो. त्याचबरोबर सामाजिक स्तरावर व जागतिक स्तरावर अन्न संकट अर्थातच अन्नटंचाई निर्माण होऊ नये म्हणून शेतकरी राजा ऊन,वारा,पाऊस अशा सर्व संकटांना सामोरे जाऊन अन्नपुरवठा शेतकरी राजा करत असतो. शेतकरी राजामुळे संपूर्ण जगाला अन्नपुरवठा होत असतो. शेतकरी राजा हा खूप मेहनती असून तो पूर्ण जगाला अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊ देत नाही.

शेतकरी हा आपला वारसा सुद्धा पुढे चालवत असतो. ग्रामीण भागात करा बऱ्याच ठिकाणी   पिढी दर पिढी शेती हा व्यवसाय सुरू असतो. यामध्ये विविध प्रकारचे आजच्या तांत्रिक पद्धतीचे बदल घडवून रासायनिक खतांचा कमी वापर करून जमीन कशा पद्धतीने सुपीक बनविता येईल याची काळजी घेऊन चांगल्या प्रकारची उत्पादने घेऊन शेतीमध्ये अजून चांगले कसे बदल घडविता येतील याबद्दल शेतकरी नेहमी प्रयत्नशील असतो.

शेतकरी वर निबंध

शेतकरी राजा त्याच्या शेतीमध्ये पिकविलेले अन्न हे कसे लोकांसाठी सुरक्षित असेल याची काळजी घेतात. माणसाच्या मूलभूत तीन गरजा आहेत अन्न, वस्त्र, निवारा आता यामध्ये सर्वात अगोदर येतं ते म्हणजे अन्न. म्हणजेच माणूस हा अन्नाशिवाय जगू शकत नाही. आणि आज आपण आपल्या ताटामध्ये जे काही खात आहोत ते फक्त आपल्या शेतकरी राजाची  देन आहे. जरी आपण त्यांना दुकानामधून विकत आणून घरी बनवत असून तरीसुद्धा ते अन्न प्राथमिक हे शेतकरी राजाने  बनवलेला असतं. हे तर तुम्हा सर्वांना ठाऊकच आहे. म्हणजे आपल्याला अन्नासाठी शेतकरी राजा किती महत्वपूर्ण आहे हे यावरून समजत.

Farmer essay in Marathi-तुम्हाला माहित आहे का?शेतकऱ्यांच्या शेतीतील उत्पादनामुळे देशांना जागतिक बाजारपेठेत सहभागी होता येते आणि तेथून परकीय चलन कमावता येते. कृषी उत्पादनाचा व्यापार हा आंतरराष्ट्रीय स्तरावर केला जातो.आणि ह्यामुळे जागतिक स्तरावर व आर्थिक परस्परवलंबनात कृषी क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका ठरते. अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली ही परंपरा अशीच सुरू राहणार. अगदी जुन्या काळापासून ते नव्या युगापर्यंत शेतकरी बांधवांनी सामाजिक अर्थव्यवस्थेला  मोठ्या योगदान दिलेले आहे.

माझा शेतकरी राजा रात्रंदिवस शेतीच्या कामासाठी उभे राहून जमिनीची चांगल्या प्रकारे मशागत करत त्याचबरोबर पशुपक्ष्यांची संवर्धन करत अन्नसुरक्षा, आर्थिक समृद्धी,सांस्कृतिक वारसा  व पर्यावरणाच्या समतोल या सर्व गोष्टींचे पालन पोषण माझा शेतकरी राजा हा जपतो आहे. आपल्या दैनंदिन जीवनात शेतकऱ्याचे खूप महत्त्व आहे हे तुम्हाला या निबंधावरून समजलेच असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि विनवणी करतो की तुमच्याकडून जेवढे शक्य असेल तेव्हा तुम्ही शेतकऱ्याला मदत करावी आणि शेतकरी राजाला नेहमी मानसन्मान द्यावा.

Farmer essay in Marathi (600 words)

शेतकरी वर निबंध | Farmer essay in Marathi (600 words)

Farmer essay in Marathi-मला खूप आनंद होत आहे की मला आज शेतकरी राजा वर निबंध लिहायला मिळाला. शेतकरी राजा हा पृथ्वीला दिलेला सर्वात मोठा वरदान आहे असं म्हटलं तरी चालेल. शेतकरी राजा हा पृथ्वीचा संरक्षक आहे.शेतकरी राजा हा फक्त पूर्ण समाजातच नाही पोषण करत तर हा अर्थव्यवस्थेचा सुद्धा पोषण करतो. शेतकरी राजा हा संपूर्ण समाजाचा, व जगाचा कणा आहे. शेती हा एक असा व्यवसाय आहे जो हजारो वर्षांपासून चालू आहे आणि पुढेही तो चालूच राहील. त्यामुळे सर्व मानवी समाज व्यवस्थितपणे टिकून आहे.शेतकरी राजा हा आपला सर्वांसाठी अन्न व अन्न संसाधने तयार करतो.

शेतकरी राजाची सुरुवात छान उगवत्या सूर्यापासून होते.सर्व शेतकरी हे अगदी कष्टाळू असतात. शेती चांगली करण्यासाठी त्यांच्या जीवनात विविध प्रकारची उद्दिष्ट असतात आणि ते उद्दिष्ट पार पाडण्यासाठी ते सकाळी लवकर उठून आपल्या दिवसाची सुरुवात करत असतात.शेतकरी राजाचे कामे हे विविध प्रकारचे असतात. प्रत्येक ऋतूनुसार शेतकऱ्याची कामे बदलत असतात जसे की वसंत ऋतु मध्ये मातीची मशागत करून बियाणे लावणे हे काम वसंत ऋतूत केले जाते.

उन्हाळ्यामध्ये पिकांचे चांगल्या प्रकारे संरक्षण करायची कामे शेतकरी करतो व शरद ऋतूमध्ये अखेर त्याचे मेहनतीचे फळ त्याला मिळते. शरद ऋतूमध्ये शेतीमध्ये उगवलेले जी काही फळे असतात त्याची कापणी केली जाते. हिवाळ्यामध्ये सुद्धा शेतीमध्ये लागवड केलेले पिकाचे संरक्षण करणे त्याचबरोबर पुढील हंगामासाठी पिकाचे नियोजन करून ठेवू नये, पशुपालन करणे हे सर्व केले जाते. शेती हा केवळ एक व्यवसाय नसून जमीन अशी जोडले गेलेलं एक नातं आहे. सर्व शेतकऱ्यांना पर्यावरणाचे वातावरण, हवामान, व मातीच्या आरोग्य कशाप्रकारे टिकून ठेवायचे या सर्व गोष्टींचे वेगळ्या प्रकारची समज असते.शेतकऱ्याचे हे ज्ञान त्याचे पिढ्यान पिढ्या चालवत असता आणि कृषी क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवीत असतात. शेतकरी राजाला शेती करताना विविध गोष्टींचा सामना करावा लागतो.

कधी कधी शेतीमध्ये चांगले पीकही घेऊन त्यावर कीड लागते, रोगराई पसरते, हवामान बदलानुसार पिकाच्या आरोग्य ढासाळते अशा अनेक गोष्टींचे चढ-उतार शेतकऱ्यांच्या जीवनात येत असतात. आणि यामुळे शेतीमध्ये बऱ्याच नुकसान सुद्धा होत असते. परंतु बदलात या नुकसानाच्या भरपाईत शेतकऱ्याला काहीच मिळत नाही. कधी कधी तर असे होते शेतकरी रात्रंदिवस कष्ट करूनही त्याच्या हाती कोणत्याही प्रकारचे फळ मिळत नाही. परंतु  तरीही शेतकरी हताश न होता आपले कष्ट चालूच ठेवतो आणि फळाची अपेक्षा करत असतो.

Farmer essay in Marathi-काही काही शेतकऱ्यांना तर अशा परिस्थितीचा सामना करायला लागतो की शेती करताना त्याचा वेळही जातो, कष्टही फारसे लागतात, पैसाही खूप खर्च होतो, नको त्या प्रकारची कर्ज त्याच्या डोक्यावर होतात, आणि हे सर्व काही फेडण्यासाठी त्याच्याकडे काही सोडत नाही आणि अशा कारणामुळे बरेच शेतकरी आत्महत्या करणे असे टोकाचे पाऊस सुद्धा उचलून घेतात.शेती या व्यवसायात कष्ट खूप आहेत. परंतु यासाठी शेतकरी राजाचे प्रयत्न नेहमी चांगलेच असतात आणि चांगले फळ देखील त्यांना मिळत असते.

Farmer essay in Marathi - 400 words

आधुनिक काळातील तंत्रज्ञानामुळे शेतीमध्ये फारसे बदल झालेले आहेत. यासाठी शेतकऱ्यांना जास्ती कष्ट घ्यावे लागत नाही किंवा वेळही लागत नाही. आजच्या तंत्रज्ञानामुळे शेतीची काम पटपट होऊ लागले आहेत. शेती तंत्रज्ञानामध्ये पीक सुधारक, पीक उत्पादन क्षमता, अशा विविध यंत्रांचा समावेश असून शेतीची कामे तीव्र गतीने होऊ लागली आहेत. तंत्रज्ञानामुळे आणि नवनवीन साधनांमुळे शेतीवर चांगल्या प्रकारचा प्रभाव पडताना दिसत आहे. परंतु काही ठिकाणी पर्यावरणावर अवलंबून असलेली शेती यावर जास्त भर दिला जात आहे.

मातीचे आरोग्य, जलस्रोत, यावर काम करणारी तंत्रे शेतकरी वापरत आहेत. आणि हा बदल भविष्यातील पिढीसाठी तसेच जमिनीचे संरक्षण करण्यासाठी,पर्यावरणातील शेतीचे नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी अधिक फायदेशीर आहे.याचा शेतकरी राजाला मोठ्या प्रमाणात हातभार लागणार आहे. यामुळे शेतकरी राजाचे कष्ट कमी होतील आणि शेतकरीला त्याला कष्टाचे फळ मिळेल.

Farmer essay in Marathi-शेतकरी राजाच्या आपल्या जीवनात एक महत्त्वाचा स्थान असून शेतकरी राजा नेहमी चांगल्या फळाची अपेक्षा करत असते मला वाटते.शेतकरी राजाला आपल्याकडून जेवढे सहकार्य होत असतील तेवढे सहकार्य करावे त्यांचे जीवन सुरळीत बनवले असे मी देवाकडे मागणी मागते.आज कालच्या वाढत्या लोकसंख्येमुळे शेतकरी राजालाही तेवढेच कष्ट घेऊन सर्व जनतेस अन्न पुरवावे लागत आहे.मला असे वाटते की ह्या जगात अधिक परिश्रम कोणी करत असेल तर तो फक्त आणि फक्त शेतकरी राजा आहे.शेतकरी राजा हा सर्व जगाचा पालनपोषण  करता आहे. 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ

शेतकरी वर निबंध लेखन.

भारत हा एक कृषिप्रधान देश असून, भारताची सुख-समृद्धी ही कृषी उत्पादनावर अवलंबून आहे. आणि हे सर्व घडवून आणण्यासाठी शेतकऱ्याचे यामध्ये मोलाचे सहकार्य आहे. भारत असा देश आहे की ज्यामध्ये 70 टक्के लोक शेती हा व्यवसाय करत आहेत. ग्रामीण भागात शेती हा व्यवसाय अधिक प्रमाणात केला जात. भारतामध्ये शेतकरी रात्रंदिवस कष्ट करूनही सुखी जीवन जगत आहे. शेतकरी हा संपूर्ण समाजाचा व जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेचा आधार बनला आहे. भारतामध्ये असंख्य प्रमाणात छोटे-मोठे खेडे आहे आणि या खेड्या गावांमध्ये सर्वत्र चालणारा व्यवसाय म्हणजे शेती. पिढी दर पिढी शेती हा व्यवसाय चालूच आहे.

शेतकरी आत्महत्या

शेती हा व्यवसाय करताना  पर्यावरणानुसार शेतीमध्ये पिकांचा बदल होतो. काही वेळेस पिके योग्य प्रमाणात वाढत नाही तर काही वेळेस पिकांवर किटके, रोगराई पसरते अरे यामुळे शेती करणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळत नाही.शेती करताना शेतकऱ्याला पीक लागवडीसाठी, बियाणे खरेदीसाठी, जमिनीच्या मशागतीसाठी  भरपूर प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो आणि एका काळात असे होते की शेतकऱ्याच्या हाती काहीच लागत नाही, यामुळे काही शेतकरी हताश होऊन आत्महत्येचा पर्याय निवडतात. मित्रांनो जर आपण शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य केल., ज्या शेतकऱ्यांकडे शेती करण्यासाठी आवश्यक ते साधने नसतील ते साधने त्यांना आणून दिले तर समाजामध्ये एक नवीन बदल घडवून व शेतकरी आत्महत्या कुठेतरी थांबेल.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Notify me of new posts by email.

Autobiography of Farmer Essay in Marathi; शेतकऱ्याची आत्मकथा

Photo of author

Table of Contents

Autobiography of Farmer Essay in Marathi : मित्रांनो, मी अल्पभूधारक शेतकरी आहे. मी या भूमीचा मुलगा आहे. ही माती माझी आई आहे. शेतात वर्षानुवर्षे कष्ट करून घाम गाळल्यानंतर मी धान्य पिकवतो. मी तुझा नम्र सेवक आहे. आज मी माझे विचार तुमच्याशी शेअर करणार आहे.

शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध | Autobiography of Farmer Essay in Marathi

आपला देश शेतीप्रधान Autobiography of Farmer Essay in Marathi आहे. ‘त्याची जमीन कशी आहे’ असा कायदा करण्यात आला. शेतात काम करणारा शेतकरी च जमिनीचा खरा मालक व्हावा, हा त्यामागचा हेतू आहे. सावकारांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवून बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत देण्यात आली.

या सर्व गोष्टींची बरीच चर्चा रंगली होती. पण या सर्व योजना खरोखरच सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या आहेत, याची खात्री कोणी कधी केली आहे का? त्यात कधी निसर्गाची उधळपट्टी, कधी पाऊस तर कधी अतिवृष्टी.

अलीकडे गावोगावी श्रीमंत शेतकऱ्यांचा, म्हणजे श्रीमंत शेतकऱ्यांचा नवा वर्ग उदयास आला आहे. सर्व लाभ या वर्गाकडून आत्मसात केले जात आहेत. हेच लोक सरकारी सुविधा मिळवण्यासाठी, सन्मान मिळवण्यासाठी आणि गरीब शेतकऱ्यांवर अन्याय करण्यासाठी वेगवेगळ्या नावाखाली लढा देतात. त्यामुळे श्रीमंत शेतकरी श्रीमंत होत आहेत; पण गरीब शेतकरी गरीब जीवन जगत आहे.

Autobiography of Farmer Essay in Marathi गरीब शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाला कधी कधी रास्त भाव मिळत नाही. मग कर्जाची परतफेड कशी करायची? हप्ते आवश्यक आहेत. शेवटी काही जण आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात, कर्जाला बळी पडतात.

ज्या मजुराची स्वत:ची शेती नाही, त्याची व्यथाही विचारू नका. त्याला पगारही दिला जात नाही. त्याला वेड्यासारखं वागवलं जातं. हे शेतमजूर पावसाळ्यात कसे जगतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? ज्या गरीब शेतकऱ्याच्या श्रमावर संपूर्ण देश जगतो, तो शेतकरी उपाशी आहे, याची देशातील जनतेला कल्पना नाही.

या सर्वसामान्य शेतकरी व शेतमजुरांकडे शासन सह शहरी नागरिकांनी लक्ष देण्याची गरज आहे. आम्ही गरीब आहोत जे भूमिपुत्राचे सच्चे सुपुत्र आहोत. आपणही स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून सन्मानाने जगू या. ‘जय जवान, जय किसान’च्या घोषणेला साजेसे जीवन आम्हा सर्वसामान्य शेतकऱ्यांनी उपभोगावे, एवढीच आमची मागणी आहे.

हा निबंधही अवश्य वाचा :-

  • Fulache Atmavrutta Nibandh | फुलांचे आत्मकथा मराठी निबंध | Fulanchi Atmakatha In Marathi
  • गणेश चतुर्थी वर मराठी मध्ये निबंध | Ganesh Chaturthi Essay In Marathi | Ganesh Utsav Nibandh in Marathi
  • एकनाथ शिंदे जीवन परिचय । Eknath Shinde Biography in Marathi
  • नेताजी सुभाषचंद्र बोस | Subhash Chandra Bose in Marathi
  • शरद पवार यांची माहिती | Sharad Pawar Biography in Marathi | Sharad Pawar Information In Marathi
  • Shravani Name Meaning in Marathi | श्रावणी नावाचा अर्थ मराठी

Leave a Comment Cancel reply

Latest post.

Free Silai Machine Yojana 2024

Free Silai Machine Yojana 2024; शेवटची संधी…! मोफत शिलाई मशीन योजने अंतर्गत या लोकांनाच मिळणार २५ हजार रुपये, त्वरीत अर्ज करा.

Vivo X100s Release Date 5000mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जर सह!

Vivo X100s Release Date: 5000mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जर सह!

Google Pixel Watch 3 Launch Date in India : हे स्मार्टवॉच IP68 रेटिंगसह येईल!

Google Pixel Watch 3 Launch Date in India : हे स्मार्टवॉच IP68 रेटिंगसह येईल!

Arham Technologies Bonus share: बोनस शेअर देण्याची कंपनीची घोषणा, जाणून घ्या संपूर्ण तपशील!

Arham Technologies Bonus share: बोनस शेअर देण्याची कंपनीची घोषणा, जाणून घ्या संपूर्ण तपशील!

MP College Admission 2023; एमपी कॉलेज प्रवेश 2023: नोंदणी कशी करावी, पाहा संपूर्ण प्रक्रिया

MP College Admission 2023; एमपी कॉलेज प्रवेश 2023: नोंदणी कशी करावी, पाहा संपूर्ण प्रक्रिया

Honda Activa 7G ने केली धमाल - शक्तिशाली इंजिन आणि आश्चर्यकारक फीचर्स

Honda Activa 7G ने केली धमाल – शक्तिशाली इंजिन आणि आश्चर्यकारक फीचर्स

Google Pay Loan : गुगल पे घरबसल्या देत आहे 1 लाख रुपयांपर्यंतचे इन्स्टंट लोन, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रक्रिया

Google Pay Loan : गुगल पे घरबसल्या देत आहे 1 लाख रुपयांपर्यंतचे इन्स्टंट लोन, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रक्रिया

Royal Enfield Bullet 350 नवी स्टोरी - 349 सीसी इंजिनसह लाँच होणार, यात काय आहे खास?

Royal Enfield Bullet 350 नवी स्टोरी – 349 सीसी इंजिनसह लाँच होणार, यात काय आहे खास?

© TechDiary.in | @ 2021-2024, All rights reserved

Privacy Policy | Disclaimer | About Us | Contact Us

My Friend Essay in Marathi Language : Maza Mitra Nibandh, Best Friend

  • by Pratiksha More
  • Mar 20, 2024 Mar 20, 2024

friendship day marathi essay

My Best Friend Essay in Marathi

माझा मित्र निबंध :.

ये दोस्ती हम नाही छोडेगे| तोडेगे दम मगर तेरा साथ ना छोडेगे |” पूर्वीच्या सिनेमामध्ये दोस्तीवर खूप गाणे असायचे आणि गोष्टी पण दोस्तीवर आधारलेल्या असायच्या. त्यामुळे आम्हाला पण वाटायचे की आपली पण अशीच दोस्ती व्हावी कोणाबरोबर तरी.

तसे माझे खूप मित्र आहेत पण आम्ही लहानपणापासून एकत्रच होतो. त्यामुळे एक ग्रुप असा तयार झाला आहे. आम्ही सगळे एकटे किंवा एखादा भाऊ किंवा बहीण असलेले आहोत. आमची कॉलनी मध्ये सगळी न्यूक्लियर कुटुंबे आहेत. त्यामुळे आम्हाला एकत्र कुटुंबातील काहीच मजा माहीत नाही. आम्ही काहीतरी सनसनाटी घडावे अशी वाट बघत होतो. तेव्हड्यात त्याचे आमच्या शाळेत पदार्पण झाले. आम्हाला खुपच आनंद झाला .चला! आता ह्याची फिरकी घ्यायची. पण त्यानेच आमची तोंडे उघडीच राहतील असे पदार्पण केले.

मला अजून आठवतो आहे त्याचा आमच्या शाळेतील पहिला दिवस!कडक गणवेष, व्यवस्थित भांग पाडलेले केस नीट नेटके व्यवस्त्थित दफ्तर, पॉलिश केलेले बूट आणि ताठ बांधा. आम्ही सगळे जण त्याच्याकडे बघतच बसलो. शिक्षकांनी ओळख करून दिली, “हा अजिंक्य जोशी. आजपासून तो आपल्या शाळेत शिकणार आहे. हा कर्नल अमेय जोशींचा मुलगा आहे” आम्ही सगळेजण खूप खुश झालो.कारण अमेय जोशी आमच्या गावाचे भूषण आहेत. त्यांचा मुलगा आमच्या शाळेत खेळात पुढे जायचे म्हणून आला. शिक्षकांनी त्याला माझ्या जवळच बसायला सांगितले. आमची ओळख झाली आणि त्या दिवसापासून आम्ही दोघे जिवलग मित्र झालो.

आमच्यात काहीही कॉमन नाही. तरीही आम्ही जोडगोळी म्हणून ओळखले जाऊ लागलो. कदाचित विरुध्द्ध चुंबक एकमेकांना आकर्षित करतात हाच नियम इथेही लागू झाला असेल. तो उंच ,मी साधारण उंचीचा. तो सडपातळ मी गुटगुटीत. तो गोरा ,मी निमगोरा. तो व्यवस्थित ,मी गबाळा. आमचे एकमेकांशी तरीही छान पटते. कारण तो सांगतो आणि मी ऐकतो. त्याच्याकडून खूप शिकता येते. कारण तो खूप हुशार आहे. तो यायच्या आधी माझा पहिला नंबर होता. आता त्याचा आणि माझा विभागून पहिला नंबर येतो. तथापि त्याचे आणि माझे आवडते विषय वेगवेगळे आहेत. तो गणितात आणि इतिहास भूगोल तसेच संस्कृत मध्ये पैकी च्या पैकी गुण मिळवतो, आणि मला सायन्स आणि भाषांमध्ये जास्तीत जास्त गुण मिळतात. त्यामुळे आम्ही एकमेकांना न येणारे विषय शिकवतो.

भविष्याची स्वप्ने :

आम्ही पुढे कोण होणार हयाबद्दल खूप चर्चा करतो आणि स्वप्न रंगवतो. त्याला त्याच्या वडिलांसारखेच आर्मीत जायचे आहे. म्हणून तो स्पर्धात्मक परीक्षांसाठी आतापासूनच तयारी करीत आहे. माझेपण आयएएस बनण्याचे स्वप्न आहे. त्यामुळे मी पण त्याच्या बरोबर स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करीत आहे. त्यामुळे आम्हाला एकमेकांचे कच्चे असलेले विषय सुधारायला मदत होते. आम्ही एकमेकांकडे जाऊन अभ्यास करतो. त्याच्याकडे त्याचे आई, बाबा आणि तो इतकीच माणसे आहेत. पण बाबा कर्नल असल्याने नोकर चाकर खूप आहेत. त्यांचे घर खूप मोठे आहे. आणि सरकारी इमारत असल्याने पूर्वीच्या ब्रिटिश अधिकार्यांचा बंगला असतो तसे आहे. मी पहिल्यांदा गेलो तर माझी छातीच दडपून गेली. आम्ही जारी फ्लॅटमध्ये राहत असलो तरी इतके मोठे घर पहिले नव्हते. पण त्याच्या बाबांच्या हे लक्षात आले आणि त्यांनी एकदम प्रेमाने मला बोलविले आणि जवळ बसवून सगळी चौकशी केली. त्यांच्या दोघांच्या बोलण्यावरून मला जाणवले की ते किती सुसंस्कृत आहेत. म्हणूनच अजिंक्य इतका सुसंस्कृत वागतो. तरीही मी पाहीले, त्यांच्या घरात कडक शिस्त पण आहे. अगदी मिलिटरी खाक्या.

म्हणूनच अजिंक्य इतका वक्तशीर, व्यवस्थित आणि हुशार आहे. त्याच्याबरोबर राहून मी पण नकळत नीटनेटका आणि वक्तशीर व्हायला लागलो. आई तर चाटच पडली .माझ्यामध्ये असा बदल कसा झाला. मी तिला अजिंक्य बद्दल सांगितले. तर ती म्हणाली ,“ बघ,खरे मित्रा असे असतात जे तुमच्यामध्ये चांगला बदल घडवून आणतात. त्यासाठी त्यांना कडू बोलावे लागले तरी ते विचार करीत नाही. नाहीतर गोड बोलणारे भरपूर असतात ज्यांना तुझ्याकडून काहीतरी फायदा असतो अजिंक्य तुझा खरा मित्र आहे. त्याला सोडू नकोस” “ मी कुठे त्याला सोडणार आहे. उलट तोच चालला आहे NDA ला कमिशन ऑफिसर बनण्यासाठी “ मी म्हणालो. आईला त्याचे आणखी कौतुक वाटले. अश्याच एका प्रसंगाने आमच्या घरात तो सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनला.

प्रसंगवधानी मित्र :

एकदा आम्ही रात्री परीक्षेचा अभ्यास करीत होतो तेंव्हा आईच्या अचानक पोटात दुखायला लागले. जवळ डॉक्टर नव्हते. बाबा पण घरी नव्हते. ती तळमळत होती. अजिंक्यने ताबडतोब त्यांच्या डॉक्टरना फोन केला आणि त्यांना गाडी घेऊन बोलविले. त्याने आणि मी आईला उचलले आणि दवाखान्यात नेले. त्याची पण आई आली, त्यामुळे मला धीर आला. आणि आईला बरे वाटले. मी विचारले “ तुला एव्हडे पटकन कसे सुचले” तर तो म्हणाला “ अरे,मिलिटरीत जायचे म्हणजे हीच तर परीक्षा असते. म्हणूनच आपले जवान सगळ्या जगात बेस्ट आहेत.”

इतका गंभीर आणि सुसंस्कृत असला तरी तो खोडकर आणि खेळकर पण आहे. तो उत्तम गातो, वॉयलिन वाजवतो, लेख लिहितो आणि नाटकात पण उत्तम काम करतो. देवाने त्याला इतके गुण दिले आहेत की वाटते, भगवान देता है तो छ्प्पर फाडके देता है. काहीच कमी नाही त्याच्यामध्ये, हा ,पण एक कमी आहे ती म्हणजे त्याला खोट अजिबात बोलता येत नाही. ह्याला कमी म्हणावे की सद्गुण. अर्थात मी त्याच्याकडून इतकं शिकलो, निदान त्याला एव्हडे तरी शिकविण्याचे माझे कर्तव्य नाही का? तुम्हाला काय वाटते?

Click Here for the Full List of Essays on Marathi.TV

Marathi, Essay on Friendship in Marathi Wikipedia Language

Related posts, 7 thoughts on “my friend essay in marathi language : maza mitra nibandh, best friend”.

I love this essay very much to read I love it wow!!! The friend was cool I love it very much wow

I love my bff this is my real story like that only, जय माराठा

ekdaam kadaaaaaaaaaaaaaak

Your friend is fantastic…

Very nice Chan aahe

It is based on my real life

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

माझा मित्र निबंध मराठी | My Friend Essay In Marathi

मित्र आणि मैत्रणींनो आज आपण माझा मित्र निबंध मराठी | My Friend Essay In Marathi लेखन 100 शब्दांमध्ये करणार आहोत.

Majha Mitra Marathi Nibandh

My friend essay in marathi

 वर्णनात्मक निबंध – माझा मित्र

अमोल हा माझा एक अनमोल मित्र आहे. अगदी बालपणापासून आमची दोस्ती. प्रथम आम्ही एकमेकांच्या शेजारी राहत होतो, त्यामुळे दिवसातले बरेचसे तास आम्ही एकत्रच असायचो. आता आम्ही नवीन घर घेतले ते बरेच दूर आहे. पण शाळा, वर्ग, बाक हा माझा व अमोलचा एकच.

अमोलचे हस्ताक्षर व चित्रकला अप्रतिम आहे. त्यामुळे अमोलच्या वया फार सुंदर असतात. अमोल हुशार आहे. त्याला सर्व विषयांत चांगले गुण मिळतात. वक्तृत्वस्पर्धा, नाट्यस्पर्धा यांत मात्र अमोल कधीच भाग घेत नाही; पण माझ्याप्रत्येक स्पर्धेला तो माझ्याबरोबर हजर असतो. माझ्या यशाचा त्याला खूप आनंद होतो.

अमोल अबोल आहे. म्हणून त्याला खूप कमी मित्र आहेत. मात्र तो मनाने फार मोठा आहे. म्हणून मला तो खूप आवडतो.

वरील निबंध हा खालील विषयांना सुद्धा चालेल

  • माझा मित्र  निबंध मराठी / Maza mitra nibandh marathi
  • मित्र निबंध मराठी /  mitra nibandh marathi
  • मित्रा वर मराठी निबंध / essay on friend in marathi

हे निबंध नक्की वाचा

  • मराठी विषयावरील निबंध संग्रह
  • असा रंगला सामना मराठी निबंध
  • आमची मुंबई मराठी निबंध 
  • भूक नसतीच तर मराठी निबंध
  • मी पाहिलेला समुद्र किनारा मराठी निबंध

मित्र-मैत्रिणीनो तुम्हाला हा  माझा मित्र मराठी निबंध  कसा वाटला ते कमेन्ट मध्ये नक्की कळवा , धन्यवाद

IMAGES

  1. नाही फाशीचा विचार,poem on farmer in marathi

    essay on my friend farmer in marathi

  2. शेतकरी मराठी निबंध

    essay on my friend farmer in marathi

  3. Quotes On Farmer In Marathi

    essay on my friend farmer in marathi

  4. My best friend essay in marathi / माझा प्रिय मित्र मराठी निबंध , 3 निबंध

    essay on my friend farmer in marathi

  5. Shetkari Marathi nibandh, essay on farmer in marathi, by Smile please world

    essay on my friend farmer in marathi

  6. शेतकरी स्टेटस मराठी

    essay on my friend farmer in marathi

VIDEO

  1. Farmer's friend poem

  2. Essay About Farmer In Telugu / 10 Lines on Farmer / Rythu gurinchi vyasam in telugu 2023 /

  3. गाय 10 ओळी खूप सोपा मराठी निबंध

  4. Farmer essay in English || Essay on farmer in English || Paragraph on farmer

  5. माझे कुटुंब मराठी निबंध

  6. शेतकरी मराठी निबंध

COMMENTS

  1. भारतीय शेतकरी निबंध मराठी

    Set 5: एक भारतीय शेतकरी निबंध मराठी - Shetkari Nibandh in Marathi - Farmer Essay in Marathi. शेतकऱ्याला अन्नदाता असे म्हणतात. शेतकरी शेतात काम करतो. तो खेड्यात, लहान ...

  2. शेतकरी मराठी निबंध

    तर मित्रांनो हे होते shetkari marathi nibandh. आपल्या देशात shetkari jagacha poshinda म्हणून ओळखला जातो. आशा करतो की हा Farmer essay in marathi तुम्हाला नक्कीच आवडला असेल. ह्या ...

  3. शेतकरी वर निबंध

    विद्यार्थी आणि मुलांसाठी शेतकरी वर निबंध farmer essay in marathi: शेतकरी हा आपल्या समाजाचा आधार आहे. आपण जे खातो त्या सर्व गोष्टी त्या त्या देतात. याचा परिणाम

  4. भारतीय शेतकरी वर मराठी निबंध Essay On Indian Farmer In Marathi

    भारतीय शेतकरी वर मराठी निबंध Essay On Indian Farmer In Marathi { ४०० शब्दांत } भारतीय शेतकर्‍यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्याला दिवसभर आपल्या शेतात ...

  5. एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध Autobiography of Farmer Essay in

    एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध Autobiography of Farmer Essay in Marathi. आपला हा देश कृषिप्रधान आहे. 'कसेल त्याची जमीन' असा कायदा झाला.

  6. भारतीय शेतकरी मराठी निबंध, Essay On Indian Farmer in Marathi

    सर्जिकल स्ट्राइक मराठी निबंध, Surgical Strike Essay in Marathi; मी रोबोट झालो तर मराठी निबंध, Mi Robot Zalo Tar Marathi Nibandh; अवयव तस्करी मराठी निबंध, Essay On Organ Trafficking in Marathi

  7. "शेतकरी जगाचा पोशिंदा" मराठी निबंध

    "शेतकरी जगाचा पोशिंदा" मराठी निबंध - Best Essay On Indian Farmer In Marathi. उभ्या जगाचा पोट भरणारा पोशिंदा उपाशी राहतो तेव्हा मात्र नटींच्या मेकअप पासून ते माणसांच्या ...

  8. भारतीय शेतकरी मराठी निबंध Indian Farmer Essay in Marathi

    Indian Farmer Essay in Marathi: शेतकरी श्रम, सेवा आणि त्यागाची साक्षात मूर्ती आहे. फाटलेले कपडे, बारीक शरीर आणि उघडे पाय त्याच्या खराब आयुष्याची कहाणी सांगतात.

  9. शेतकऱ्याचे आत्मवृत मराठी निबंध Autobiography Of A Farmer Essay In Marathi

    शेतकऱ्याचे आत्मवृत Autobiography Of A Farmer Essay In Marathi. शेतकरी म्हणजे फक्त शेतात राबणारा माणूस नाही तर स्वतःच्या मेहनतीने लोकांसाठी अन्न पिकविणारा देव म्हणा.

  10. माझा मित्र वर मराठी निबंध Essay On My Friend In Marathi

    Essay On My Friend In Marathi माझा सर्वात चांगला मित्र हा माझ्या आयुष्यातील आनंद, सांत्वन आणि सामायिक अनुभवांचा स्रोत आहे. या निबंधात आमची मैत्री, आमची जोडणी,

  11. Shetkaryachi Atmakatha in Marathi

    My Friend Essay in Marathi Language : Maza Mitra Nibandh, Best Friend. My School Essay in Marathi | माझी शाळा Mazi, Majhi Shala Nibandh. ... 23 thoughts on "Shetkaryachi Atmakatha in Marathi | Essay on Farmer, Nibandh Shetkari" ...

  12. Shetkari Nibandh in Marathi

    February 25, 2024 by marathischool. शेतकरी निबंध Shetkari Nibandh in Marathi Essay on Farmer in Marathi -शेतकरी हा भारतामधील सर्वात अभागी जीव आहे. शेतकरी भारतातील सर्वांना अन्न पुरवठा ...

  13. भारतीय शेतकरी वर मराठी निबंध Essay On Indian Farmer In Marathi

    भारतीय शेतकरी वर मराठी निबंध Essay On Indian Farmer In Marathi ( २०० शब्दांत ) कोणीतरी अगदी बरोबरच म्हटले आहे, "भारत ही खेड्यांची भूमी आहे आणि शेतकरी हा ...

  14. शेतकरी वर निबंध

    Farmer essay in Marathi-शेतकरी राजाच्या आपल्या जीवनात एक महत्त्वाचा स्थान असून शेतकरी राजा नेहमी चांगल्या फळाची अपेक्षा करत असते मला वाटते ...

  15. Autobiography of Farmer Essay in Marathi; शेतकऱ्याची आत्मकथा

    आपला देश शेतीप्रधान Autobiography of Farmer Essay in Marathi आहे. 'त्याची जमीन कशी आहे' असा कायदा करण्यात आला. शेतात काम करणारा शेतकरी च जमिनीचा खरा मालक ...

  16. शेतकऱ्याची संपूर्ण माहिती Information about farmer in Marathi

    तर मित्रांनो वरील लेखात आपण farmer information in Marathi पाहिले. या लेखात आम्ही farmer बद्दल सर्व काही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

  17. My Friend Essay in Marathi Language : Maza Mitra Nibandh, Best Friend

    Shetkaryachi Atmakatha in Marathi | Essay on Farmer, Nibandh Shetkari. My School Essay in Marathi | माझी शाळा Mazi, Majhi Shala Nibandh. Water Pollution Information in Marathi Essay | Jal Pradushan in Marathi. ... 7 thoughts on "My Friend Essay in Marathi Language : Maza Mitra Nibandh, Best Friend" ...

  18. माझा मित्र निबंध मराठी

    वरील निबंध हा खालील विषयांना सुद्धा चालेल. माझा मित्र निबंध मराठी / Maza mitra nibandh marathi. मित्र निबंध मराठी / mitra nibandh marathi. मित्रा वर मराठी निबंध / essay on ...

  19. माझा आवडता मित्र वर मराठी निबंध Essay On My Favourite Friend In Marathi

    माझा आवडता मित्र वर मराठी निबंध Essay on My Favourite Friend in Marathi (200 शब्दात). मैत्री हा एक मौल्यवान दुवा आहे जो आपले जीवन सुधारतो आणि वैभव हा माझ्या विश्वातील एका अद्भुत ...

  20. Farmer Essay In Marathi Language

    1. Farmer Essay In Marathi Language 1. Step To get started, you must first create an account on site HelpWriting.net. The registration process is quick and simple, taking just a few moments.

  21. माझा आवडता मित्र मराठी निबंध My Best Friend Essay In Marathi

    नमस्कार मित्रांनो, या पोस्टमध्ये आपण माझा आवडता मित्र मराठी निबंध वर चर्चा करणार आहोत. My Best Friend Essay In Marathi मध्ये आपण हा निबंध १००, २००, ३०० ४००,

  22. Free Essays on Essay About Farmer In Marathi through

    Free Essays on Essay About Farmer In Marathi. Get help with your writing. 1 through 30. We've Got Lots of Free Essays ... Marathi Essay On Nature My Friend ... 12 Pages; My School Essay In Marathi The veg vs non-veg health debate April 13, 2009 | The perpetual debate that is waged about the inadequacies of a vegetarian diet versus the hazards ...